कोकणात निसर्ग चक्रीवादळाची एन्ट्री....

  • 3 years ago
गणेशगुळे (ता. रत्नागिरी) येथे रात्रीपासून निसर्ग वादळाचा तडाखा बसू लागला. वेगवान वारे, मुसळधार पाऊस सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू होता. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस व वारा सुरू झाला. समुद्रात लाटांचे तांडव सुरू होते. समुद्रकिनाऱ्यावरील सुरूची झाडे व आंबा बागेतील कलमे उन्मळून पडली. ग्रामस्थांना दक्षतेचे आदेश दिले आहेत.