अखेर पोलिसांनी डागली कारवाईची तोफ,  बेकायदेशीर सुरू होता हा व्यवसाय

  • 3 years ago
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना व्हायरसने सर्वांची धडकी भरली असून, ताळेबंदीमुळे कुणीही बाहेर निघणे टाळत आहे. प्रशासन कोरोना बंदोबस्त आणि इतर प्रशासकीय कामात लागले आहे. याचाच फायदा घेत वाळू माफियांनी संधी साधू वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू केली होती. घाटावर एलसीबीने वाळू माफियांचे मुक्से आवळल्यानंतर घाटाखालील परिस्थितीबाबत सकाळ ने पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचे लक्ष वेधले होते. यावर पूर्णा काठच्या पोलिस स्टेशन दखल घेत कारवाईची सुरवात केली. दरम्यान, जळगाव जामोद पोलिसांनी (ता. 19) 21 लाख 90 हजारांचा वाळू साठा जप्त केला आहे. 
#buldana #sand #sakal #vidarbha #EsakalNews #SakalNews #MarathiNews #Viral

Recommended