उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थानच सत्तेला सुरुंग लावतंय का ? | Uttarakhand | Sakal Media |

  • 3 years ago
उत्तराखंड राज्यातील मुख्यमंत्री पदाची खुर्ची टिकवून ठेवणं तितकसं सोपं नाही. उत्तराखंड राज्य नव्याने निर्माण होऊन अद्याप 20 वर्षेही पूर्ण झाले नाहीत. तोवर याठिकाणी तब्बल 11 वेळा मुख्यमंत्री बदलले गेले आहेत. यामध्ये नारायण दत्त तिवारी हे एकच असे मुख्यमंत्री होते, ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. पण, उर्वरित मुख्यमंत्र्यांपैकी असा एकही मुख्यमंत्री नव्हता, जो आपला कार्यकाळ पूर्ण करु शकला. आणि याचं कारण मानलं गेलंय ते म्हणजे मुख्यमंत्री निवास.... अर्थात मुख्यमंत्र्यांचा बंगला....
काय आहे ही नेमकी भानगड... याबाबतच आपण आज माहिती घेणार आहोत... 'आज काय विशेष'मध्ये..
.#Uttarakhand #TrivendraRawat #TirathSinghRawat #CMBunglow #CMsOfficialBungalow

Recommended