दिवसाला दोन हजार चपाती अन्‌ भाकरी.. | women's day| Mangali varambale | kolhapur

  • 3 years ago
मंगल व्हरांबळे यांची संघर्षातून फुललेली कहाणी
कोल्हापूर : कोणतीही स्त्री स्वयंपाक करताना थकत नाही. कुटुंबासाठी स्वयंपाक करताना तर तिचा उत्साह दुणावतो. मात्र परिस्थितीने तिचे हेच कौशल्य उदरनिर्वाहाचे साधन कसे होऊ शकते. याची प्रचिती संभाजीनगरातील मंगल शरद व्हरांबळे देतात. दिवसातून दीड ते दोन हजार चपाती, भाकरी करूनही त्यांचा उत्साह मावळत नाही. गेली पस्तीस वर्षे पतीच्या माघारी दोन मुलांच्या शिक्षणासह संसारगाडा ओढताना स्वयंपाकातील तरबेजपणाच्या जोरावर दोन हॉटेलमधील स्वयंपाकासह सांस्कृतिक कार्यक्रमात जेवणाच्या ऑर्डर्सना त्या पुरवतात.
मंगल मावशींना अमित आणि आशिष ही दोन मुले. दोघेही अनुक्रमे तिसरी व दुसरीत पतीची साथ सुटली. मंगलमावशी अशिक्षित. त्यामुळे नोकरी लागण्याची शक्‍यता नाही. शहरातील नामांकित दोन हॉटेल्समध्ये दुपारच्या वेळेत चपाती, भाकरी करायला जाऊ लागल्या. मोठ्या कार्यक्रमासाठी घरातूनच चपाती, भाकरी बनवू लागल्या. या कमाईतून मुलांना शिक्षण दिले. एका मुलाला किराणा दुकान थाटून दिले तर एका मुलाला रिक्षा व्यवसायासाठी मदत केली. पूर्वी पत्र्यांच्या शेडात राहणाऱ्या मंगल मावशींनी स्वतःची दोन घरे बांधली.
(बातमीदार - नंदिनी नरेवाडी)
(व्हिडीओ - बी.डी.चेचर)

Recommended