मुंबई : अंकित तिवारीच्या वडिलांना मारहाण कशामुळे? एन्ड्रियाची प्रतिक्रिया

  • 6 yıl önce
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याची पत्नी एन्ड्रिया विरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईमधल्या एका कुटुंबानं हा पोलिसात कांबळी दाम्पत्याविरुद्ध ही तक्रार केली आहे. रविवारी दुपारी कांबळी आणि त्यांची पत्नी मॉलमध्ये खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी तिथेच खरेदीसाठी आलेल्या राजेंद्र कुमार यांचा हात चुकीनं विनोद कांबळींच्या पत्नी एन्ड्रियाला लागला. यावेळी चिडलेल्या एन्ड्रियानं राजेंद्र कुमार यांना मारहाण केली. मॉलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्यं कैद झाली आहेत. विनोद कांबळी यांनीही या कुटुंबाला शिव्या देत धक्काबुक्की केल्याची तक्रार राजेंद्र कुमार यांनी दाखल केली आहे.