औरंगाबाद : फकिराबादवाडीचे सुपुत्र शहीद किरण थोरात यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

  • 6 years ago
महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद किरण थोरात यांच्यावर अत्यंत शोककूल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मिरच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात या जवानाला वीरमरण आलं होतं. काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राचा आणखी एक वीरपुत्र शहीद झाला आहे. किरण पोपटराव थोरात असं या जवानाचं नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडीचा ते रहिवासी आहेत. कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात या जवानाला वीर मरण आलं. किरण यांचं वय 31 वर्षे होतं.

For latest breaking news, other top stories log on to: &

Recommended