Navjot Singh Sidhu Resigns From Bjp Membership

  • 8 years ago
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. या दोघांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी दिला. पंजाबमध्ये पुढील होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच सिद्धू यांनी नव्या पक्षाची औपचारिक घोषणा केली होती.चंदीगढमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिद्धू यांनी ‘आवाज ए पंजाब’ पक्षाची घोषणा केली.