Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/3/2025
पंढरपूर - आषाढ शु.अष्टमीला तोंडले येथून संतांच्या पालखींचा सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची आणि संतश्रेष्ठ माऊलींच्या पालखीची बंधुभेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो. याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो. सोपानकाकांचा रथ माऊलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडावेळ थांबतो. यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. तत्पुर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले. यावेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलींच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी याना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माऊलींची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कमी पोहचली. आषाढी एकादशीचा सोहळा यानिमित्तानं शिगेला पोहोचला आहे.

Category

🗞
News

Recommended