Breast Cancer म्हणजेच स्तनांचा कर्करोग ! स्त्रीयांना होणाऱ्या आजारांमधला सर्वात गंभीर आजार. या आजाराची लक्षणं जेवढ्या लवकर समजतील तेवढं या आजारावर उपचार करणं सोप्प होतं. छातीत गाठ येण्यापासून ते काखेत गाठ येण्यापर्यंत असे अनेक लक्षणं या आजाराची आहेत. म्हणून हा आजार झालाय हे ओळखण्यासाठी आजाराची लक्षणं कोणती हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.