राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व निलंबन ही काँग्रेससाठी महत्त्वाची सुसंधी - गिरीश कुबेर
  • last year
सुरतच्या न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर ज्या तरफेनं पुढच्या सगळ्या कारवाया झाल्या, ते खरंच कौतुकास्पद आहे. खरं तर राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व निलंबन ही काँग्रेससाठी महत्त्वाची सुसंधी आहे हे त्या पक्षानं लक्षात ठेवायला हवं. राहुल गांधी हे भाजपसाठी एका अर्थानं पंचिंग बॅग ठरलेले आहेत. धोपटण्याचा दगड जसा कुठल्याही राजकीय पक्षांना लागतो, तशा पद्धतीनं राहुल गांधींचा भाजपनं वापर केलेला आहे. त्यामुळे भाजपचा मोदी विरुद्ध राहुल गांधी असा राजकीय पट मानला जाईल, असा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीचे दोनच नायक असायला हवेत, नेते असायला हवेत, एका बाजूला राहुल गांधी आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी, असा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचं लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी अधोरेखित केलं आहे.
Recommended