Ravindra Dhangekar: 'पुणेकरांना मिळकत करात ४० टक्के सवलत'; रवींद्र धंगेकरांची माहिती | Pune | Kasba
  • last year
'मागील अनेक वर्षापासुन पुणे शहरातील नागरिकांना मिळकतकरात सवलत मिळावी यासाठी सर्वजण लढा देत होतो. त्या लढ्याला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक झाली असून त्यामध्ये शहरातील मिळकत करात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे' अशी माहिती काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच 'कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत' अशा शब्दांत शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी टोला लगावला.
Recommended