Chhagan Bhujbal on BJP: 'जिथं भाजपाच्या विरोधात बोललं जातं...'; भुजबळांची केंद्र सरकारवर टीका
  • last year
विरोधी पक्षाचे तोंड बंद करण्यासाठी भाजपाचे केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे. येवला दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भुजबळ बोलत होते. 'पहिला प्रयोग हा माझ्यावरच करण्यात आला. राजकीय दृष्टीतून जिथे जिथे भाजपाच्या विरोधात बोललं जातं. जिथं जिथं त्यांच्या विरोधातील सरकार आहे तेथील प्रमुख नेत्यांवर अशा यंत्रणेद्वारे कारवाईचा बडगा उचलला जातो' असा आरोपही भुजबळ यांनी यावेळी केला.
Recommended