Kasba Bypoll: 'पैशाच्या वापराला कसब्यातील नागरिक उत्तर देणार'; Prashant Jagtap यांची प्रतिक्रिया
  • last year
गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. अशातच कसब्यातील मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ उपस्थित झालेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी 'पहिल्या दिवसापासून ही निवडणूक धंगेकरांचीच होती आणि पैशाच्या वापराला कसब्यातील नागरिक उत्तर देणार' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Recommended