Assembly Budget Session : व्हीप प्रकरणी Uday Samant, Sunil Prabhu यांनी केल्या भूमिका स्पष्ट
  • last year
सुप्रिम कोर्टाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले होते. मात्र राज्याच्या अर्थसंक्लपीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( शिंदे गट ) प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावला आहे. यामुळे पु्न्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ अधिवेशनाच्या उपस्थितीसाठी हा व्हीप बजावण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. तर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी ते आमच्यावर व्हीप बजावू शकत नाहीत, असं म्हणत कोर्टात जाण्याचे संकेत दिले आहेत.
Recommended