Ashok Chavhan: 'मूळ सहीचं बनावट लेटरपॅड वापरून...'; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गंभीर आरोप
  • last year
काँग्रेस आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. तसेच, विनायक मेटेंप्रमाणेच आपल्यालाही संपवण्याचा कट चालू असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेत तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या आरोपांविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा हा डाव असल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले.
Recommended