Devkinandan Maharaj: 'चार बायका आणि चाळीस मुलं यावर...'; देवकीनंदन महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद?

  • last year
लोकसंख्या नियंत्रण कायदा आपल्या देशात येत नाही तोपर्यंत प्रत्येक सनातनी कुटुंबाने पाच ते सहा मुलांना जन्म द्यावा असं वक्तव्य देवकीनंदन ठाकूर महाराजांनी केलं आहे. देवकीनंदन ठाकूर महाराज नागपूरमध्ये श्रीकृष्ण कथा सांगण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. भारतात लोकसंख्येचा एवढा मोठा स्फोट झाला की कुणी विचारही करू शकत नाही. चार बायका आणि चाळीस मुलं यावर कुणीच काही बोलत नाही असंही देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Recommended