2 months ago

Kasaba Bypoll Election : पुण्यात कसबा पेठचे उमेदवार हेमंत रासनेंचा अर्ज भरताना भाजपाचे शक्तिप्रदर्शन

Lok Satta
Lok Satta
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी भाजपा उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाच्या राज्यातील बड्या नेत्यांनी सहभाग नोंदवला. चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे त्याचसोबत पुण्यातील भाजपा नेते उपस्थित होते.

Browse more videos

Browse more videos