Viral Video : मुंबईतील थरार, बसने धडक दिल्याने वयोवृद्ध थेट गाडीखाली, अन्...

  • 2 years ago
मुंबईतील पवई भागात एक थरारक घटना घडली. वाहतूक कोंडी झालेली असताना एक वयोवृद्ध वाट काढत जात होता. मात्र, अचानक या व्यक्तीने एका बससमोरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि बसचालकाला तो न दिसल्याने बसने थेट धडक दिली. विशेष म्हणजे बसने धडक दिल्यानंतर हा वयोवृद्ध थेट गाडीखाली गेला. मात्र, दोन्ही चाकांच्या मध्ये पडल्याने या व्यक्तीचा जीव वाचला.