रमेश लटके यांच्या निधनामुळे लागलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पहिल्यांदाच मशाल या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. पण या निवडणुकीची दुसरी विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप-शिंदे गट अशी ही पहिलीच लढत होणार आहे. म्हणजेच ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल असा हा सामना रंगणार आहे.