Parents on Students Homework | शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयावर पालक म्हणतात, 'मग स्कूल फ्रॉम होमच करा' |Sakal
  • 2 years ago
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इयत्ता पहिली ते चौथी या सगळ्या विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यायचा नाही असा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय होऊ शकतो असं दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं. मात्र तत्पूर्वी पालकांनी आणि शिक्षकांनी हा निर्णय होऊ नये यासाठी मागणी केली आहे. त्यांना जर गृहपाठ दिला नाही तर जसं वर्क फ्रॉम होम आहे तसे विद्यार्थ्यांना स्कूल फ्रॉम होम करा असा टोला पालकांनी लगावला आहे.
Recommended