फॉक्सकॉन आणि वेदांताची गुंतवणूक पंतप्रधानांनी दबाव आणून गुजरातला नेल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे, पंतप्रधानांनी पुन्हा लायसन्सराज आणल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असूनसुद्धा या अगोदर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेंटर अहमदाबादला नेलं, अहमदाबादला आंतरराष्ट्रीय विमानसेवा नसल्याने मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन लादली गेली, या देशाचे कोट्यावधी रुपये नुकसान झाले असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. #PrithvirajChavan #NarendraModi #vedantafoxconn