मिस्टर Fadnavis, Shivsenaचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही! - Sanjay Raut |

  • 2 years ago
आमचा लाऊडस्पीकर हा जनतेचा बुलंद आवाज आहे. कोणाला कितीही पिपाण्या वाजवू द्या. शिवसेनेचा लाऊडस्पीकर 56 वर्ष झालं सुरु आहे. महाराष्ट्र आणि देश निष्ठेनं शिवसेनेच्या मागे उभा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मिस्टर फडणवीस, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. कारण हे सरकार मजबूत पायावर उभा नसल्याचे देखील राऊत यावेळी म्हणाले.

#SanjayRaut #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraCabinet #ShindeSarkar #Minister #BJP #ShivSena #ChandrakantPatil #Rebel #MLA #Elections #MaharashtraPolitics