आषाढ महिना सुरू झाला की सगळ्यांना वेढ लागते ते म्हणजे पंढरपूरच्या वारीचे. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात त्यांच्या लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला जातात. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे. वारीतून या सांप्रदायाची सामाजिकता अधोरेखित होते. पायी केल्या जाणाऱ्या या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचा उल्लेख सापडतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची क्षणचित्रे बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -