Pune: पुण्यात लहान मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा

  • 2 years ago
फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची चव चाखण्यासाठी सगळेच आतुर असतात. अगदी लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत आंबा हे फळ सगळ्यांच्याच आवडीचे मानले जाते. याच निमित्ताने पुण्यात आज हापूस आंबे खाण्याची स्पर्धा पार पडली. मनसे ने पुण्यात गा स्पर्धेचे आयोजन केले होते.

लहान मुलांना हापूस आंब्याची चव चाखता यावी आणि उन्हाळ्याचा आनंद मिळावा, यासाठी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेमध्ये पलक निखिल मालुसुरे या चिमुकलीने 3 मिनिटांत 3 आंबे खाऊन प्रथम क्रमांक मिळवला. आयोजकांतर्फे तिला आंब्याची पेटी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.
#mango, #mangocompetition, #mns, #summer, #summervibes, #punenews, #pune, #mangoes, #mangoeatingcompetition,