Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/19/2022
Raj Thackeray | मनसेच्या हिंदुत्वावर राज ठाकरेंच्याच व्यंगचित्रातून टीकास्त्र | Sakal Media

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या वारीची घोषणा केल्यानंतर राज्यात नवीन राजकारणाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येला गेले होते तेव्हा राज यांनी काढलेले व्यंगचित्राचे होर्डिंग्स पुण्यात विविध ठिकाणी झळकलेले पाहायला आज मिळाले. सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व असा मजकूर लिहीत राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाच्या भूमिकेवर टीका करण्यात आलेली आहे. युवासेनेकडून हे होर्डींग्स लावल्याची चर्चा आहे. मात्र पुणे शहरात विविध ठिकाणी होर्डिंग्ज झळकल्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Category

🗞
News

Recommended