Beed: सदावर्ते दाम्पत्याची वकिलीची सनद रद्द करा : अॅड. हेमा पिंपळे

  • 2 years ago
बीड : अॅड. गुणरत्न सदावर्ते हे बार कांऊन्सिल गोवा आणि महाराष्ट्राचे सदस्य पदाकरिता निवडणुकीला उभारले त्यावेळी धर्म आणि जातीचे नांवावर मत द्या असा संविधानाचे उल्लंघन करणारा प्रचार त्यांनी केला. यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द‌ केलेले आहे.
अॅड गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील हे वकिली सारख्या पवित्र न्यायदानाच्या क्षेत्रात अनैतिक मार्गाचा, गुन्हेगारी, प्रक्षोभक, विध्वंसक, चिथावणीखोर मार्ग वकिलीचा वापर करून वागतात.
तसेच विशिष्ट प्रतिष्ठितांना टार्गेट करून असंविधानिक भाषा वापरून समाजाला वेठीस धरतात, वारंवार जातिवाचक बोलणे, समाजामध्ये तेड निर्माण करणे, आंदोलकांची दिशाभुल करुन पैसा उकळणे ई मार्गाने वकिली करतात
ज्यामुळे ते वारंवार व्यवसायिक तत्वांचे उल्लंघन करत असल्याने त्यांची वकिलीची सनद रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. हेमा पिंपळे यांनी केली.
#beed, #beednews, #beedliveupdates, #gunratnasadavarte, #gunratnasadavartenews, #sadavartecase, #hemapimpale, #ncp, #stemployee, #stemployeeprotest,

Recommended