बुलढाण्याच्या शुभमचं आयपीएलमध्ये खेळण्याचं स्वप्न होणार साकार

  • 2 years ago
व्हिओ: आयपीएलच्या 15व्या पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे. पंधराव्या हंगामाता पहिला सामना कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यात होणार आहे. यंदाच्या मोसमात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराचं नाव चमकलंय. आयपीएलच्या गुजरात टायटन्स संघाकरीता खामगाव येथील शुभम कापसेची नेट गोलंदाज म्हणून निवड झालीयं. शुभमने नॅशनल हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. शुभम विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19, 23 आणि 25 वर्षांखालील सामन्यांमध्ये खेळलाय. याच बरोबर रणजी ट्रॉफीसाठीही त्याने प्रतिनिधीत्व केलयं. त्याला 2010 मध्ये विदर्भ निवासी क्रिकेट अकादमीसाठी खेळण्याची संधीही मिळाली होती. आयपीएल संघामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी शुभला गोपाल शर्मा आणि लक्ष्मीकांत पांडे यांचं प्रशिक्षण लाभलयं. त्यांच्या मार्गदर्शनात त्याने आयपीएल संघामध्ये स्थान मिळविण्यात यश प्राप्त केलयं. शुभम 2017-18 मध्ये इंदूर येथे रणजी करंडक जिंकणाऱ्या विदर्भ संघाचा सदस्य होता. त्याला हिमाचलविरुद्ध एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. आता आयपीएल संघ गुजरातमध्ये नेट गोलंदाज म्हणून निवड झालेला शुभच्या कामगिरीकडे सर्वांच्याच नजरा लागलेत.

Recommended