नंदकिशोर चतुर्वेदींना कुठे लपवलं हे आदित्य ठाकरेंना विचारा | सोमय्या
  • 2 years ago
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. ईडीच्या कारवाईत श्रीधर पाटणकर यांचा नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संबंध असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ईडीच्या कारवाईनतंर नंदकिशोर चतुर्वेदी फरार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचाही नंदकिशोर चतुर्वेदी यांचा संबंध आहे. यावर बोलताना ते कुठे आहेत याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला पाहिजे असे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले आहेत. ते म्हणाले, नंदकिशोर चतुर्वेदी फरार असून त्यांना आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर लपवला आहे की रश्मी वहिनींनी वर्षा बंगल्यावर लपवले हे सांगावं.
Recommended