आयपीएल सुरू होण्यापूर्वीच सूर्यकुमार यादवने मुंबईचं टेंशन वाढवलं

  • 2 years ago
पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचं आयपीएलपूर्वीच टेंशन वाढवलंय. कर्णधार रोहित शर्माने आयपीएलपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरं दिली. सूर्यकुमार यादव अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही आणि त्यामुळे तो पहिल्या सामन्याला खेळण्याची शक्यता फार कमी आहे. मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी सूर्यकुमार यादव हा एक आहे. त्यामुळे तो मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला दुखापत झाली होती आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली होती. सूर्यकुमार यादव सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे आणि तो आमच्या कॅम्पमध्ये येण्याची आम्ही वाट पाहतोय, अशी माहिती रोहित शर्माने दिलीय. NCA कडून परवानगी मिळताच तो कॅम्पमध्ये दाखल होईल. २६ मार्चपासून आयपीएल हंगामाची सुरुवात होतेय आणि मुंबईला सर्व सामने घरच्या मैदानात खेळण्याची संधी मिळणार आहे. जोरदार तयारी केलेली असतानाही दुखापतीमुळे मात्र मुंबई इंडियन्स सध्या काहीशी चिंतेत आहे.