फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस; जबाब नोंदवणं यात काही गैर नाही | गृहमंत्री

  • 2 years ago
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक नव्हे तर सहावेळा नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही. नोटीस म्हणजे समन्स नाही. फडणवीसांकडे काही माहिती आहे. ती माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस गेले आहेत. तसेच एसआयटीच्या कार्यालयातून काही गोपनीय पत्रं आणि तांत्रिक माहिती बाहेर गेली आहे. त्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी त्यांचा जबाब नोंदवला जात आहे, असं दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात एकूण 24 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आली आहे. फडणवीसांची साक्ष बाकी होती. त्यांना काही प्रश्नावली पाठवली होती. त्यांच्याकडून प्रश्नावलीची उत्तरे आली नाही. म्हणून पोलिसांनी त्यांच्या घरी त्यांचा जबाब घेण्याचा निर्णय घेतला. त्यात गैर काही नाही, असंही त्यांनी सांगितलं. दिलीप वळसे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

Recommended