Police Patrol: जागते रहो ! कशी असते पोलिसाची रात्रीची गस्त जाणून घ्या रिपोर्ताजच्या माध्यमातून

  • 2 years ago
घरफोडी, दरोडा, हाणामाऱ्या खून यासारखा एखादा प्रसंग घडतो. त्यावेळी पोलिस कुठे काय करतात, रात्रीची गस्त राहीलीच नाही... असे काहीजण सहज बोलून जातात. हाफ पॅन्टमधील हातात काठी घेऊन जागते रहो, जागते रहो...असे ओरडत रात्रीचा खडा पहारा देणारा पोलिस हा जुन्या चित्रपटातच पाहयाचं का? अशी जनमानसात शंका येणे स्वाभाविक आहे. त्याला आपण तरी कसे अपवाद असू शकतो. पोलिस ठाण्यात दिवसभराचे काम, बंदोबस्तात, गुन्ह्यांच्या तपास कामात व्यस्त असणाऱ्या पोलिसांवर रात्रीच्या गस्तीचा जबाबदारी असते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, थकलेल्या जीवांना रात्रीची निवांत झोप घेता यावी यासाठी रात्रभर पोलिस रस्त्यावर गस्त घालतात. कशी असते त्यांची रात्रीची गस्त हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते.पोलिसांची चौकस नजर, चाणाक्ष्य बुद्धी, तत्परता आणि समयसूचकता अगदी जवळून पाहिली असून या रिपोर्ताजच्या माध्यमातून मांडली आहे.
(स्टोरी-बातमीदार : राजू मोरे)
(व्हिडिओ बी.डी.चेचर)
#police #policepatrol #patrol #policeofficers #officers

Recommended