अल्पवयीन मुलाकडून सायकल चोरी;४३ विविध कंपन्यांच्या सायकलींचा समावेश

  • 2 years ago
सोलापुरातील कुंभारी येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने तब्बल ४३ कंपनीच्या अडीच लाख रुपयांच्या सायकली चोरल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याने दोन अल्पवयीन मुलांसोबत सोलापूर शहर परिसरातील ४३ विविध कंपनीच्या एकूण २ लाख ५० हजार रुपयांच्या चोरलेल्या रेंजर सायकली बाहेर काढून दिल्या. या विरुद्ध भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.