आधी युक्रेनचे तीन तुकडे केले, नंतर सैन्य घुसवलं, पुतिनसमोर अमेरिकाही हैराण

  • 2 years ago
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी गेल्या दोन आठवड्यात जे केलंय, ते पाहून अमेरिका आणि युरोपही हैराण आहे. अमेरिकेने निर्बंध लादले, युरोपनेही धमकी दिली, तरीही पुतिन त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. उलट मध्ये आलात तर तुम्हालाच परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आणि युक्रेनचे त्यांनी तीन तुकडे केले. रशियाच्या सीमेला लागून असलेल्या युक्रेनमधील डोनेट्स्क आणि लोहांस्क प्रांताला त्यांनी आधी स्वायत्त राष्ट्र म्हणून मान्यता देत युक्रेनमधून वेगळं केलं. नंतर या स्वायत्त केलेल्या देशांमध्ये सैन्य घुसवलं आणि थेट सुरू झालं ते युक्रेनवरचं आक्रमण.. हा विषय सविस्तर नकाशासह समजून घेऊ, पण त्यासोबतच या परिस्थितीबद्दल तुमचं मत काय आहे, भारताने यात पडावं का, रशिया भारताचा चांगला मित्र आहे, पण त्यांनी जे केलंय ते योग्य आहे का ही मतं कमेंटमध्ये जरूर सांगा.

Recommended