फोटोसाठी काहीपण! चाहत्याने उर्फी जावेदचा हात धरून काढला सेल्फी, व्हिडीओ व्हायरल

  • 2 years ago
उर्फी जावेदचा अनेकदा तिच्या ड्रेसमुळे नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनेत्री उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी उर्फी तिच्या सिग्नेचर स्टाइल मधल्या कट शॉर्ट ड्रेसमध्ये रस्त्यावरुन चालताना दिसली. यावेळी अचानक एक चाहता उर्फी जावेदचा जबरदस्तीने हात पकडत सेल्फी काढताना दिसला. त्या व्यक्तीची अशी स्टाईल पाहून उर्फी सुरुवातीला थोडी अस्वस्थ झाली त्यानंतर हसताना दिसली.