Perth Scorchers4th BBL Championship Celebration l BBLविजेतेपदाचे 'रक्ताने माखलेले' सेलिब्रेशन |Sakal
  • 2 years ago
Perth Scorchers4th BBL Championship Celebration lBBLविजेतेपदाचे 'रक्ताने माखलेले' सेलिब्रेशन |Sakal

मेलबर्न: ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगची (Big Bash League) फायनल नुकतीच मेलबर्नमधील डॉकलँड क्रिकेट स्टेडियमवर पार पडली. पर्थ स्कॉचर्सने (Perth Scorchers) सिडनी सिक्सर्सचा (Sydney Sixers) तब्बल ७९ धावांनी पराभव करत आपल्या चौथ्या विजेतेपदाला गवसणी घातली.
दरम्यान, पर्थ स्कॉचर्सने आपल्या चौथ्या बीबीएल (BBL) विजेतेपद जल्लोषात (Perth Scorchers 4th BBL Championship Celebration) साजरे करण्यास सुरूवात केली. सर्व खेळाडू उत्तेजित झाले होते. याच दरम्यान, पर्थ स्कॉचर्सचा स्टार गोलंदाज जे रिचर्डसन सोबत (Jhye Richardson) एक दुर्घटना घडली. विजय साजरा करत असताना त्याच्या नाकाला एका संघ सहकाऱ्याचा खांदा लागला. त्यामुळे त्याच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला होता. मात्र विजयाच्या धुंदीत त्याने याकडे साफ दुर्लक्ष केले. तो या रक्ताने माखलेले नाक घेऊनच समालोचकाला प्रतिक्रिया देत होता.
Recommended