आदित्य ठाकरेंची आदिवासी पाड्यांना भेट; पाणीप्रश्न सोडवण्याची ग्वाही

  • 2 years ago
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील खरशेत, शेंद्रीपाडा, सावरपाडा येथील आदिवासी पाड्यांना भेट दिली. आदिवासी भागातील समस्या जाणून घेतल्या. सावरपाडा येथील पाण्याच्या भीषण समस्या त्यांनी जाणून घेतली. काही दिवसांपूर्वीच सावरपाडा येथील महिलांचा नदी पार करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होतो. आज त्याच लोखंडी पुलाचं उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं. आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरुन शिवसैनिकांनी चार दिवसात या लोखंडी पुलाच काम केलं. या ठिकाणी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही तुमची माफी मागितली पाहिजे की आतापर्यंत या गोष्टी झाल्या नाहीत. शहरीकरण वाढत असताना राज्यातील अजूनही काही भाग असा आहे की जिथं साध्या सुविधाही पोहचल्या नाहीत. येत्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत आदिवासी पाड्यातील पाणीप्रश्न गांभीर्याने घेऊन तो सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

Recommended