भाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

  • 2 years ago
पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि आता कॉफी टेबल बुक तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र याला विरोध दर्शवत पुणे महानगरपालिकेच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन छेडले. या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कॉफीटेबल बुक मध्ये शहराचा वारसा आणि महत्व मांडले जाते. परंतु सत्ताधारी पक्षाने कोविड मध्ये केलेल्या कामाचे स्पष्टीकरण मांडणार असल्याचा दावा केलाय. आणि या कॉफीटेबल बुक साठी 39 लाख रुपये खर्च होणार असून हे पुणेकरांचे पैसे वाया जातील असा आरोप देखील केला व भाजपा विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Recommended