जळगावात एसटी कर्मचाऱ्यांकडून भीक मागो आंदोलन

  • 2 years ago
गेल्या अडीज महिन्यांपासून अमागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव एसटी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विभागीय कार्यालयापासून एसटी स्थानकापर्यंत भीक मागून आंदोलन केले आहे. बसस्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या दुकानदार, पादचारी, वाहनधारकांकडून भीक मागत अनोख्या पद्धतीत शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. भीक मागून जमा झालेली रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात येणार आहे. सरकार एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आता तरी पूर्ण करणार का सवाल त्यांनी यावेळी निषेध करत केला आहे.