बीडमध्ये घडला भलताच प्रकार; अखेर आमदार संदीप क्षीरसागरच झाडावर चढले

  • 2 years ago
बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिलांचं थकित वेतन अजूनही मिळालं नाहीय. या मागणीसाठी आज प्रजासत्ताक दिनी दोन महिलांनी झाडावर चढून आंदोलन केले होते. आपल्या मागण्या मांडण्यासाठी चक्क झाडावर दोन तास आत्मदहन करण्यासाठी उभ्या होत्या. दरम्यान, याच आंदोलनस्थळी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर पोहचले. महिलांना झाडावर चढविल्याने आंदोलन प्रमुखावर पालकमंत्री धनंजय मुंडे चांगलेच संतापले होते. तर या महिलांना झाडावरून खाली उतरविण्यासाठी खुद्द आमदार संदीप क्षीरसागर थेट झाडावर चढले. आमदार क्षीरसागर यांच्या विनंती नंतर आंदोलनकर्त्या महिला खाली उतरल्या. सर्व आंदोलकांना आश्वासन देत या सगळ्या गोष्टी थांबल्याचे पाहायला मिळालं. आजूबाजूच्या परिसरात आमदार संदीप क्षीरसागर स्वतः झाडावर चढले ही चर्चा रंगली.