साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेला मारहाण; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले

  • 2 years ago
सातारा येथील पळसवडे गावच्या माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे‌. वनविभागाच्या महिला कर्मचारी या तीन महिन्यांच्या गर्भवती असून त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घडलेल्या प्रकाराची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती स्वतः या कर्मचाऱ्याने दिली. पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सातारा तालुक्यातील पळसावडे येथे हा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या वनरक्षक महिलेला मारहाण झाली, त्या तीन महिन्यांच्या गर्भवती आहेत. या सर्व प्रकारावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले ऐका..