क्या हुवा तेरा वादा अशोक चव्हाणांना मराठा समन्वयकांकडून सवाल

  • 2 years ago
मराठा समाजासाठी 36 पैकी 14 वस्तीग्रह सुरू करण्याची सर्व पूर्तता झाली असून, येत्या 15 ऑगस्टला त्याचे उद्घाटन करण्याचा माणस आहे. तसेच सारथीची आठ कार्यालय उभारण्याचा निर्णय आधीच झाला असून जागेच्या संदर्भात काही अडचणी असल्यास महसूल मंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेऊन तो विषय सोडवला जाईल. असं आश्वासन बांधकाम मंत्री व मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला होता. परंतु याची पूर्तता न झाल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुंबई येथील अशोक चव्हाण यांचे मेघदूत या निवासस्थाना बाहेर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Recommended