Parbhani: परभणीत विद्यापीठ सुधारणा कायदा विधेयकाविरोधात भाजपच्या युवा मोर्चाकडून निषेध

  • 2 years ago
परभणी : परभणीत आज सोमवारी (ता. १७) पहाटे 5 वाजता महाविकास आघाडीचे खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयसमोर भारतीय जनता युवा मोर्चा व युवती मोर्चा, परभणी जिल्ह्याच्या वतीने कलर स्प्रे पेंटींग करून विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक महाराष्ट्र राज्य सरकारने मागे घ्यावे या करिता राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. या प्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, जिल्हा युवती संयोजिका गिताताई सुर्यवंशी, भाजपा महानगर महिला जिल्हाध्यक्ष कुलकर्णी, शर्मिष्ठा कुलकर्णी, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष रोहित जगदाळे, तालुका उपाध्यक्ष विनायक कांतकडे यांच्याह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. (व्हिडीओ : योगेश गौतम)
#parbhani #parbhaninews #sanjayjadhav #bjp #mahavikasaaghadi #maharashtra

Recommended