शहापूरच्या गोठेघर वाफे गावात एका आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची चर्चा 

  • 2 years ago
आपल्या पाळीव प्राण्यांवर अतोनात प्रेम करणारी माणसं आपल्याला अगदी सहज भेटतील. पण कुणी आपल्या रेड्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी करत असल्याचं तुम्ही कधी ऐकलंय आत्तापर्यंत आपण घरातल्या पाळीव कुत्रे, मांजर किंवा इतर प्राण्यांचे वाढदिवस साजरे होताना पाहिले आहेत.पण शहापूर तालुक्यातल्या एका गावात असाच काहीसा प्रकार घडला आहे. चक्क रेड्याच्या वाढदिवसामध्ये फटाके, मटणाचे जेवण व लाखोंची उधळण यामध्ये पाहायला मिळाली