पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून कंगना रणौतची पंजाब सरकारवर जोरदार टीका

  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर गेलेले असताना त्यांच्या सुरक्षेत काही गंभीर त्रुटी आढळून आल्या. या प्रकारामुळे पंजाब सरकारवर सर्वच स्थरातून जोरदार टीका होत आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच अभिनेत्री कंगना रणौतनेही या प्रकाराविषयी आपलं मत व्यक्त केलं असून तिने पंजाब दहशतवादी कारवायांचं केंद्र बनत असल्याची टीका केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने या प्रकाराबद्दल भाष्य केलं आहे. ती म्हणाली, पंजाबमध्ये जे घडलं ते लज्जास्पद आहे. आदरणीय पंतप्रधान हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते, प्रतिनिधी आणि १४० कोटी जनतेचा आवाज आहेत. त्यांच्यावर असा हल्ला म्हणजे देशातल्या प्रत्येक नागरिकावर हल्ला आहे, आपल्या लोकशाहीवरचा हल्ला आहे.कंगना पुढे लिहिते, पंजाब हे दहशतवादी कारवायांचं केंद्र बनत आहे. आता आपण हे थांबवलं नाही तर देशाचं मोठं नुकसान होऊ शकतं. यासोबतच कंगनाने #BharatStandWithModiji असंही लिहिलं आहे.

Recommended