निवडणूक जिंकण्यासाठी खोटं वचन द्यायचं ही शिवसेनेची परंपरा नव्हे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • 2 years ago
अनेकजण आम्ही चंद्र आणि तारे तोडून आणू, अशा पद्धतीची आश्वासने देतात. जनता या आश्वासनांना भुलून मत देते आणि फसते. त्यानंतर पाच वर्षात त्याबद्दल एकही शब्द काढला जात नाही. वर्षभराने कोणी विचारले तर निवडणुकीत असं बोलावं लागतं, असे काही राजकारण्यांकडून सांगितले जाते. मात्र, एखादं आश्वासन खोटं असेल, भले त्यामुळे निवडणूक जिंकता येत असेल तरी मी ते देणार नाही. निवडणूक जिंकण्यासाठी खोटं वचन द्यायचं ही शिवसेनेची परंपरा नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.