Christmas 2021 | लक्ष-लक्ष विद्युत रोषणाईनं उजळलं बांद्रा रेक्लेमेशन

  • 2 years ago
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळे सज्ज झाले आहेत. नाताळ निमित्ताने सगळीकडे रोशनाई केलेली पाहायला मिळतेय. मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशन, वरळी सी-लिंक विद्युत रोषणाईने खुलून गेलाय. येथे येशु जन्माचे देखावे सादर करण्यात आले आहेत. पांढ-या शुभ्र कापसाने सजवलेले हिरवेगार ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी चांदण्यांच्या लाईट्सने सर्व परिसर सजला आहे. सँटाक्लॉजचे पुतळे, मुखवटे, स्टार लाईट्ससह ख्रिसमस डिअर देखील पाहायला मिळत आहेत. लहानग्यांपासून मोठयांपर्यंत सर्वांसाठी परिसर सज्ज झाला असून अधिक आकर्षण ठरतोय. नाताळनिमित्ताने मुंबईतील सर्व परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय. यंदाही लखलखत्या लाखो विद्युत दिव्यांची रोषणाई पाहण्यासाठी बांद्रा येथे मुंबईकरांना गर्दी केली आहे.

Recommended