देशातील सर्वात मोठ्या राज्यात रात्रीचे निर्बंध; लवकरच महाराष्ट्राचाही नंबर?
  • 2 years ago
#OmicroneVariant #NightRestrictions #StateGovernment #MaharashtraTimes
देशातलं सर्वात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशाला करोनाचा विळखा पुन्हा एकदा बसू लागला,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना करोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या चिंतेनं लॉकडाऊन करण्याच्या निष्कर्षापर्यंत आणून ठेवलंय...दुसरीकडे अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधानांना आणि निवड़णुक आयुक्तांना पत्र लिहून निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केलीय़...कारण...ओमायक्रॉन आणि करोनाची वाढती रुग्णसंख्य़ा अशात महाराष्ट्रातही करोनाचे उतरणीला लागलेले रुग्ण वाढू लागलेत...रोजची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात असणारी मुंबई अचानक पाचशेच्या घरात जाऊ लागली आहे...त्यातच करोनाचा भाऊ ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात पाहायला मिळू लागलेत करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून धडा घेत राज्य सरकारने आता वेळीच पावलं उचलण्याचं ठरवलं आहे...शुक्रवार 24 डिसेंबरपासून राज्यात काही निर्बंध लागू केले जाणार आहेत...टास्क फोर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय
Recommended