मुंबई : वाहतूककोंडीचा विद्यार्थ्यांना फटका; उशीर झाल्यामुळे देता आली नाही परीक्षा

  • 2 years ago
मुंबईतील वाहतूककोंडीचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. पवई जेवीएलआर येथे मेट्रोचं काम सुरू असलेल्या मार्गावर अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे पवई येथील परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विद्यार्थ्यांना उशीर झाला. त्यामुळे सीबीएससी बोर्डाकडून घेण्यात आलेल्या केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षेस जवळपास १५० विद्यार्थ्यांना मुकावे लागले. वेळेवर न पोहोचल्यामुळे पवई निटी रमाडा येथील परीक्षा प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावर रोखून धरले आणि परीक्षेस बसण्यास मज्जाव केला. यावेळी परीक्षा प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात पवई पोलिसांत आणि संबंधित परीक्षा घेणाऱ्या संस्थेला निवेदन देत पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.

Recommended