खासगीकरणाविरोधात सरकारी बँकांचं देशव्यापी काम बंद आंदोलन

  • 2 years ago
केंद्र सरकार संसदेत बँकिंग कायद्यांमध्ये दुरुस्तीचं विधेयक सादर करणार आहे. यामुळे भविष्यात कोणत्याही सरकारी बँकेचे खासगीकरण करणं सोपं होणार आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आगामी काळात सरकारी बँकांच्या खासगीकरणासाठी विधेयक सादर करणार असल्याचा आरोप करत या बँकांच्या संघटनांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यानुसार गुरुवार १६ डिसेंबर आणि शुक्रवार १७ डिसेंबर अशा २ दिवशी सर्व सरकारी बँक कर्मचारी संपावर आहेत. या बंदमुळे ग्राहकांच्या सेवेवर थेट परिणाम होत आहे.

#Nationalbank #employee #protest #India #maharashtra

Recommended