वसईतील परफ्युम कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

  • 2 years ago
वसई शहरातील साष्टीकरपाडा येथील एका परफ्युम कारखान्याला १६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी भीषण आग लागली. या आगीत कारखान्यातील माल जळून खाक झाला आहे. याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कारखान्यात परफ्यूमच्या बाटल्या असल्याने आगीची तीव्रता वाढली आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अचानक आग लागल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

#Fire #Vasai

Recommended